आमच्याबद्दल
कोल्हापूर फर्स्ट बद्दल
कोल्हापूर फर्स्ट – पुढच्या पिढीसाठी शाश्वत विकासाचा संकल्प कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनाने अनेक नामांकित संघटनांच्या पुढाकाराने स्थापन झालेली “कोल्हापूर फर्स्ट” हि संस्था कोल्हापूरच्या शाश्वत विकासासाठी कटिबद्ध आहे.
कोल्हापूरचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व अबाधित राखत, नव्या पिढीच्या अपेक्षा पूर्ण करणारे आधुनिक कोल्हापूर घडवण्याचा आमचा संकल्प आहे. समाजातील सर्व स्तरांतील लोकांना सोबत घेऊन, विकास आणि परंपरेचा सुंदर संगम साधणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे.
“कोल्हापूर फर्स्ट” – शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी!
उद्दिष्टे आणि ध्येय
आमची उद्दिष्टे
कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाच्या व्हिजन ने कटिबद्ध असलेल्या अनेक नामांकित संस्थांच्या पुढाकारातून कोल्हापूरचा शाश्वत विकास साध्य करण्यासाठी, कोल्हापूरचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व अबाधित राखून नेक्स्ट जनरेशनला अपेक्षित कोल्हापूर बनविण्यासाठी – “कोल्हापूर फर्स्ट”
आमचे ध्येय
- मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरात स्थापन करणे .
- १०० एकर भुखंडामध्ये आय. टी. पार्कचा विकास.
- कोल्हापूर वैभववाडी रेल्वे लाईन प्रकल्प.
- नवीन एम. आय. डी. सी. व मोठे उद्योग.
- आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्यासाठी सर्व सोयी सुविधांचा विकास
- आयुक्तालयाची स्थापना व कोल्हापूर शहरातील इन्फ्रास्ट्रक्चर विकास
- कोल्हापूरची हद्दवाढ
- कोल्हापूर-सांगली-सातारा जिल्हयाचे टुरिझम सर्किटद्वारा धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक गड किल्ले व पर्यटन विकास
- कोल्हापूरचा मेडिकल हब म्हणून विकास
- सौर उर्जेद्वारे वीज निर्मितीकरिता मोठे प्रकल्प द्वारा लघू व मध्यम उद्योगांना वीजपूरवठा
- कोल्हापूर-सांगली-सातारा फौन्ड्री ॲन्ड इंजिनिअरिंग हा विकास