बातम्या

कोल्हापूर च्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या "कोल्हापूर फर्स्ट" या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे उद्घाटन ९ मार्च २०२५ रोजी दिमाखात पार पडणार आहे.

आमच्याबद्दल

divider-white
god

कोल्हापूर फर्स्ट बद्दल

Divider

कोल्हापूर फर्स्ट – पुढच्या पिढीसाठी शाश्वत विकासाचा संकल्प कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनाने १४ नामांकित संघटनांच्या पुढाकाराने स्थापन झालेला “कोल्हापूर फर्स्ट” हा उपक्रम कोल्हापूरच्या शाश्वत विकासासाठी कटिबद्ध आहे.

कोल्हापूरचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व अबाधित राखत, नव्या पिढीच्या अपेक्षा पूर्ण करणारे आधुनिक कोल्हापूर घडवण्याचा आमचा संकल्प आहे. समाजातील सर्व स्तरांतील लोकांना सोबत घेऊन, विकास आणि परंपरेचा सुंदर संगम साधणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे.

“कोल्हापूर फर्स्ट” – आपल्या भविष्यासाठी, आपल्या कोल्हापूरसाठी!

उद्दिष्टे आणि ध्येय

Divider
Vision

आमची उद्दिष्टे

कोल्हापूर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा असलेले शहर असून, त्याचा शाश्वत विकास साध्य करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. कोल्हापूरच्या प्राचीन परंपरांचा सन्मान राखत, आधुनिकतेशी सुसंगत अशी विकासात्मक वाटचाल करणे आवश्यक आहे. आम्ही कोल्हापूरला एक स्मार्ट, हरित आणि समृद्ध शहर बनवण्याचा दृढ निश्चय केला आहे.

शहरातील नागरिकांना उत्तम जीवनमान मिळावे, त्यांच्यासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि पुढच्या पिढीसाठी एक सुवर्णमयी भविष्य निर्माण व्हावे, यासाठी “कोल्हापूर फर्स्ट” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, तंत्रज्ञान आणि पर्यावरण या सर्व बाबतीत कोल्हापूरच्या विकासाला चालना देऊन, शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे, हे आमचे अंतिम ध्येय आहे.

Mission

आमचे ध्येय